इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल

दुबई, दि.९ – इंग्लंडच्या क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहिर केलेल्या क्रमवारीनुसार इंग्लंड १२१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर तितक्याच गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसर्‍या स्थानावर आहे. नवी क्रमवारी निश्चित करताना ऑगस्ट २०१० नंतरच्या सामन्यांचा विचार केला गेला आहे. आयसीसी क्रमवारीत इंग्लंड संघाने प्रथमच अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत २००२ नंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची प्रथमच चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. १२० गुणांसह भारतीय संघ तिसर्‍या स्थानावर आहे. तर ११२ गुणांसह ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. क्रमवारीत श्रीलंका पाचव्या(१०८ गुण), पाकिस्तान सहाव्या(१०५गुण) स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणार्‍या इंग्लंड संघाला टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. टी-२० क्रमवारीत दक्षिण आफ्रिका १३० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड १२९ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. ११९ गुणांसह श्रीलंका तिसर्‍या तर १११ गुणांसह भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे.

Leave a Comment