युवी झाला फीट

नवी दिल्ली, दि. ९ – कॅन्सरशी झगडत युवराज सिंगने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे आता युवराज पुन्हा एकदा लवकरच मैदानावर परतेल अशी आशा त्याच्या सार्या फॅन्सना लागून राहिली आहे. युवराज सिंगच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

आयपीएल गव्हर्निंग समितीचे चेअरमन राजीव शुक्ला म्हणाले, `गेल्या एक महिन्यात युवराजने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत कसून सराव केला आहे. फिजियो आणि ट्रेनर त्याच्यावर देखरेख ठेवताहेत. 

टवेण्टी-२० वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानसाठी त्याने खेळावे असे वाटते. पण अखेरीस याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय निवड समितीच घेईल.’

कॅन्सरशी लढणारा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग हा लवकरच टीम इंडियात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवराज सिंग लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करणार शक्यता आहे. टीम इंडिया मिडल ऑर्डर बॅटसमन युवराज सिंगने टीम इंडियात ’कमबॅक’ करेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

 

 

Leave a Comment