ब्लेक आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक

लंडन,दि.९- ’लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये ९.७५ सेकंदात शर्यतीत रौप्यपदक पटकावल्यानंतर ब्लेक म्हणाला, ’मला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. त्यासाठी मी कसून तयारीसुद्धा करत आहे. मी क्रिकेटचा फार मोठा फॅन आहे. याचबरोबर मी उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. बॉलिंगमध्ये मी भारताच्या झहीर खानपेक्षाही अधिक वेगाने बॉलिंग करू शकतो’ असा दावा करतानाच आपण पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

सुपरस्टर ब्रायन लारा व ’मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हे त्याचे आवडते क्रिकेटपटू आहेत. यंग विराट कोहलीनेही त्याला तितकंच प्रभावित केले.

योहान ब्लेकने ’क्रिकेटपटू’ म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. २६ डिसेंबर १९८९ मध्ये जमैकामध्ये जन्मलेला ब्लेक ’किंगस्टन क्रिकेट क्लब’कडून क्रिकेट खेळला होता. बॉलिंग करताना त्याचा धावण्याचा वेग पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याला धावपटू होण्याचा सल्ला दिला अन् ब्लेकनेही तो अंमलात आणला. ’लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जमैकाच्या उसेन बोल्टने सुवर्णपदक पटकावले तर जमैकाच्याच योहान ब्लेकने या शर्यतीत रौप्यपदकावर ताबा प्रस्थापित केला.

 

 

Leave a Comment