यू ट्यूबवरून नरेंद्र मोदी फेस टू फेस

अहमदाबाद दि.८ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २४ ऑगस्ट रोजी इंटरनेटवरून चॅट करणार असून या लाईव्ह व्हिडीओचे थेट प्रसारण यू ट्यूबवरून करण्यात येणार आहे. गुगल व हँगआऊट अॅप्लीकेशन च्या माध्यमातून हे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. यामुळे नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या रांगेत जाऊन बसणार आहेत. कारण या आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही कांही काळापूर्वी याच तर्‍हेने प्रश्नकर्त्यांशी संवाद साधला होता. या अॅप्लीकेशनमुळे १० लोकांशी एकाचवेळी व्हिडीओ चॅट करण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंदांनी पाहिलेल्या भारताच्या  स्ट्राग अॅन्ड ग्लोरिअर इंडिया संदर्भात प्रश्नकर्ते नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारू शकणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपला प्रश्न मेसेज अथवा व्हिडीओ टेक्स्ट मार्फत १३ ऑगस्टपूर्वी पाठवायचा असून त्यातील निवडक प्रश्नकर्त्यांना मोदींसमवेतच्या चर्चेसाठी आमंत्रण दिले जाणार आहे असे गुजराथ प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

मोदी यांच्या सोशल साईटवर प्रंचड संख्येने फॅन्स असून ट्वीटर वर मोदींचे ८ लाख तर फेसबुकवर ५ लाख फॅन्स आहेत. इंटरनेटचा वापर करून लोकांशी सवाद साधणार्‍यात मोदींच्या नंबर अन्य भारतीय राजकारणी व्यक्तींच्यात बराच वरचा आहे. मोदींचे गुगल प्लस अकौंट उघडल्याला केवळ दोनच महिने झाले आहेत तरीही या अकौंटवर त्यांचे आत्तापर्यंत ८० हजार फॉलोअर्स आहेत असेही सांगण्यात आले.

Leave a Comment