साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांची ओळख पटली

पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा संशयितांना ओळखण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने या दोघांची ओळख पटली आहे.

शहरातील वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिर ते गरवारे पूल या दरम्यान १ ऑगस्ट रोजी चार बॉम्बस्फोट झाले तर दोन बॉम्ब निकामी करण्यात आले.

बॉम्बस्फोटाच्या वेळी मोटरसायकलवर संशयितरित्या भटकणार्‍या दोघांना महाराष्ट्र एटीएसच्या पोलिसांनी ओळखले असून सीसी टीव्ही फुटेज तपासात महत्वाची भूमिका निभावेल; असे एटीएसच्या अधिकार्‍याने सांगितले.

Leave a Comment