विकासकडून पदकाची अपेक्षा

ओलोपिंक स्पर्धेत मंगळवारपर्यत भारतला तीन पदके मिळाली आहेत. त्याशिवाय मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत उपांत्य फेरीत पोचल्याने आणखी एक पदक भारताच्या पदरात पडणार आहे. त्यामुळे यावेळेस प्रथमच भारताला चार पदके मिळणार आहेत. मंगळवारी रात्री होत असलेल्या थाळीफेकमध्ये विकास गौडाकडून आणखी एक पदक मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेरीकोमचा पुढचा सामना ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बॉक्सगच्या सामन्यात विजेंद्र सिंगला उज्बेकीस्तानच्या अब्बास अतीव कडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्याच्याकडून करण्यात येणारी पदकाची अपेक्षा मावळली आहे. मंगळवारी भारताला मेडल मिळवून देण्याची जबाबदारी आता विकास गौडावर असणार आहे. त्याने थाळी फेकमध्ये क्वालीफायमध्ये ६५ मीटरपेक्षा लांब थाळी फेकुन अंतिम दहा जनात स्थान मिळवले आहे. त्याची ही कामगिरी पाहता तो या अतिंम सामन्यात पदक मिळवून देईल असे वाटते. त्यामुळे रात्री १२.१५ वाजता होणाऱ्या या अंतिम लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Comment