विलासराव देशमुख आयसीयूमध्ये; व्हेंटिलेटरवर

मुंबई,७ ऑगस्ट-काँग्रेसचे वरिष्ठ नेते व केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने सोमवारी दुपारी चार वाजता चार्टर्ड विमानाने चेन्नईला हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खास तज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार करण्यात येत आहेत.

विलासराव देशमुख यांच्यावर किमान आठवडाभर चेन्नईत उपचार केले जातील, असे बोलले जात आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबिय असल्याचे सांगण्यात आले.
मात्र त्यांना कोणत्या आजाराचा त्रास आहे, याबाबत माहिती देण्यात येत नाहीये.

मागील चार दिवसापूर्वी त्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. तसेच मागील चार दिवसापासून ते मुंबईत विश्रांती घेत होते.

विलासरावांना कोणता आजार आहे याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. याआधी त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता असे सांगण्यात येत आहे.