
नासाने पाठविलेले १ टन वजनाचे महाप्रंचड क्युरिऑसिटी हे अंतराळयान मंगळावर सुखरूप उतरले असल्याचे यूएस स्पेस एजन्सीकडून जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास नासाच्या मंगळाच्या कक्षेत फिरत असलेल्या ओडिसी या उपग्रहाकडून रोव्हर मंगळाच्या विषुववृत्तीय भागात मोठ्या विवरात सुरक्षितपणे उतरल्याचा संदेश आला आणि गेली १० वर्षे यासाठी झटून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रत्र, संशोधकांनी नासाच्या कंट्रोल रूममध्ये एकच जल्लोश केला. मंगळावर जीवसृष्टीचे कांही पुरावे मिळतात का याचा शोध हे यान घेणार आहे. नासाने मंगळावर पाठविलेले हे चौथे यान असून या उपक्रमाची सुरवात १९९७ साली केली गेली होती.