नवी दिल्ली: टीम अण्णाच्या आंदोलनामुळे ढेपाळलेली भ्रष्टाचार विरोधी मोहीम आंदोलन थांबल्यामुळे अधिक गतिमान होईल; असा टोला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक शरद यादव यांनी लगावला.
टीम अण्णाच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला खीळ: शरद यादव
संसदेने काही काळापूर्वी भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मोहीम हाती घेतली. त्याचा परिणाम म्हणून काही नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २७ लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली. मात्र टीम अण्णा आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या सततच्या आंदोलनांमुळे या लढाईला खीळच बसली आणि त्यातील सातत्य नष्ट झाले; असा आरोप यादव यांनी केला. मात्र आता हे आंदोलन आटोपते घेतल्याने ही मोहीम संसदेच्या माध्यमातून पुन्हा जोमाने सुरू करण्यात येईल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकपाल विधेयकाबाबत सर्वसहमती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
