कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी

सध्या जगातच कॉर्पोरेट क्षेत्राला अनेक फाटे फुटायला लागले असून, त्यातून नवनवे उपक्रम सुरू होत आहेत. कारखानादारांनी केवळ पैसा कमावता कामा नये, त्यांना ज्या समाजातून पैसा मिळत असतो त्या समाजालाही काही तरी दिले पाहिजे. असा विचार पुढे आला आहे. जगातला सर्वात श्रीमंत मानला जाणारा बिल गेटस् या बाबत आदर्श काम करीत आहे. तो आपला पैसा समाजाच्या कामासाठीच खर्च करीत आहे. आता प्रत्येकच उद्योगपती असा विचार करीत आहे. प्रत्येकच व्यवसायाचे स्वरूप वेगळे आहे. त्यांचा सामाजिक आधार वेगळा आहे. त्यामुळे त्यांना त्यांना करावे लागणारे कामही वेगळे असणार आहे. त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी असे म्हटले जाते. तशा प्रत्येक उद्योग संघाचा जनसंपर्क विभाग असतोच पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचे स्वरूप वेगळे असते. या कामात लोकांसाठी शिक्षण संस्था काढण्यापासून ते त्यांना घरे बांधून देण्यापर्यंतच्या कामाचा अंतर्भाव आहे. कामाचे स्वरूप व्यापक झाले की त्याचे प्रशिक्षण कोणी तरी घेतले पाहिजे आणि त्या कामाच्या स्वरूपाची पूर्ण माहिती असलेले लोक उपलब्ध झाले पाहिजेत अशी गरज निर्माण होते. त्यातून ते ते स्वतंत्र अभ्यासक्रम आपोआपच सुरू होतात.

दिल्लीतल्या कॉर्पोरेट व्हॅल्यू मॅनेजमेंट (सीव्हीएम) या संस्थेने असा अभ्यासक्रम सुरूही केला आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा आहे. तो तीन महिन्यांचा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्याचे नाव ऍडव्हान्स्ड पोस्ट ग्र‘ॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (एपीजीसीसीएसआर) असे त्याचे नाव आहे. या अभ्यासक्रमात कॉर्पोरेट एथिक्स, ह्युमन राईटस्, लीगल मॅनेजमेंट ऑफ सीएसआर, सीएसआर ऑडिटस्, सीएसआर अँड एचआरएम (ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट), ब्रँडिंग सीएसआर असे विषय शिकवले जातात. या अभ्यासक्रमातले विषय या नव्या क्षेत्राच्या गरजा ओळखून निश्‍चित केले आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचा कायदेविषयक भाग त्यात आहे. आर्थिक घटकही घेण्यात आले आहेत. सध्या विविध उद्योगात सीएसआर हा विभाग सुरू आहे. त्याची कामे सुरूही आहेत पण  ती कामे साधारणत: जनसंपर्क विभाग सांभाळणारा माणूस सांभाळत असतो. याच कामाचे खास शिक्षण घेतलेला माणूस त्या खात्याला मिळत नाही तोपर्यंत ते काम पुरेशा समाधानकारक तेने केले जाणार नाही.या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही सामाजिक विषयांच्या पदवीधरांना पात्र समजले जाईल. अधिक माहितीसाठी आदित्य भार्गव, सीव्हीएम, १२९ अन्सल चेंबर्स – २, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली ११० ०६६ या पत्त्यावर संपर्क साधावा. फोन क्रमांक ०११ ४६१६९६०९ असा आहे. इ.मेल [email protected]

Leave a Comment