जुन्दालविरुद्ध पुरावे उभे करण्यासाठी कसाबने दिली उपयुक्त माहिती

मुंबई: कुख्यात दहशतवादी जबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुन्दाल याची ओळख पटविण्यात आणि २६/११ च्या हल्ल्यातील त्याच्या सहभागाचे पुरावे जमा करण्यात २६/११ च्या खटल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीचा मोठा उपयोग झाला आहे.

जुन्दाल यानेच २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यापूर्वी १२ अतिरेक्यांना पाकिस्तानात हिंदी बोलायला शिकवले. मुंबईत पोहोचल्यावर काय करायचे आणि काय करायचे नाही; याबद्दलच्या सूचनाही जुन्दालानेच त्यांना दिल्या. मुंबईवरील हल्ल्यासाठी १२ जणांची निवड करण्यात आली. मात्र दोघांना ऐनवेळी वगळण्यात आले.

जुन्दालाची ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसल्याने गुप्त पद्धतीने जुन्दालाच्या पित्याचा डीएनए मिळविण्यात आला. मात्र जुन्दालाचे जुने छायाचित्र ओळखू न शकलेल्या कसाबने सौदी अधिकार्यांकडून पाठविण्यात आलेल्या नव्या छायाचित्रावरून त्याला अचूक ओळखले. त्यामुळे जुन्दाल विरुद्ध ठोस पुराव उभे करणे तपास यंत्रणांना शक्य झाले आहे.