प्रेक्षकांना नाही सुपरफूल

अनोळखी व्यक्ती : मुझे आपका नाम नहीं सुनाई दिया, आय एम सॉरी.
सिड : हाय, सॉरी. आय एम सिड
अनोळखी व्यक्ती : आप बहुत ‘विटी’ हैं
सिडः आप बहुत चर्चगेट हैं.
मी या चित्रपटातील एक छोटासा विनोद उदाहरणाच्या रुपात तुमच्यासमोर सादर केला आहे. हा विनोद आपण नक्कीच कुटुंबासमवेत बसून पाहू शकतो. याला आपण व्हेजिटेरियन कॉमेडीही म्हणू शकतो. या छोट्याशा उदाहरणावरुन या चित्रपटात कशाप्रकारचा विनोद वापरण्यात आला आहे, याचा अंदाज प्रेक्षक निश्चितच बांधू शकतात. सिद (रितेश देशमुख) चित्रपटाचा हिरो आहे. विटि आणि चर्चगेट मुंबईतील प्रसिद्ध रेल्वे स्थानकांची नावे आहेत. चित्रपटातील अनोळखी व्यत्त*ी ही ’गे’ आहे. चित्रपटात रितेश देशमुख गे आहे की, त्याचा सगळ्यात चांगला मित्र आदि (तुषार कपूर) गे आहे या प्रश्नावर चित्रपटातील अधिकाधिक विनोद आधारित आहेत. इतकेच नाही तर या दोघांचे ज्या मुलींवर प्रेम आहे, त्या मुलीसुद्धा लेस्बियन आहेत का ? यावरही अनेक विनोद आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. जी व्यक्ती या धाटणीतील विनोद नॉन स्टॉप दोन तास आणि सोळा मिनिटे सहन करु शकते, अशा प्रेक्षकांसाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

सिद व्यवसायाने डीजे आहे. सिदला स्वतःचे भविष्य उज्वल दिसत नसते. आदि एक अभिनेता आहे. आदिचा अभिनय केवळ जाहिरातींपर्यंतच मर्यादित राहिला आहे. साहजिकच यावरुन दोघांचा वाईट काळ सुरु आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येते. सिदचा ’बॅड पिरेड’ सुरु असल्यामुळे त्याला सॅनिटरी नॅपकिनचे एक पाकिट विकत घेतानाही विचार करावा लागतो. आदि एका टॅरो कार्ड रिडरकडून सल्ला घेतो. ’एस’ या अक्षरावरुन नाव असलेली तरुणी त्याचे आयुष्य बदलून टाकणार असे आदिला टॅरो रिडरकडून कळते. हा चित्रपट संगीत सिवनच्या ’क्या कूल है हम’ (२००५)चा प्रीक्वेल समजल्या जाऊ शकते. कारण ’क्या कूल है हम’ या चित्रपटातला हिरोसुद्धा छातीच्या उजव्या भागात तिळ असणार्‍या मुलीच्या शोधात असतो. आदिला ’एस’ अक्षरावरुन नाव असलेली मुलगी भेटते. आदि त्या मुलीला लग्नाची मागणी घालतो. शिवाय तिला एक महागडी हिर्‍याची अंगठीही भेट म्हणून देतो. मात्र ती मुलगी त्याला लग्नासाठी नकार देते. हं पण ती अंगठी मात्र आत्ताही त्या मुलीकडेच आहे. ती गोव्यात आहे. आदि आणि सिद अंगठी परत मिळवण्यासाठी गोव्याला जातात.

आता ही चित्रपटाची कहाणी आहे, असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. चित्रपटाची मुळ कथा हिरोच्या अंगठीभोवती फिरते असे आपल्याला चित्रपट बघताना वाटते. मात्र तसे अजिबात नाहीये. चित्रपट पुढे सरकल्यानंतर चित्रपटात अंगठीचा साधा विषयही निघत नाही. मग अखेर चित्रपटाची कथा काय आहे हा प्रश्न उपस्थित होतो. बॉलिवूडच्या अधिकाधिक हिट चित्रपटांचा संदर्भ घेतल्यास ’हाऊसफूल २’ या चित्रपटात ’आये…’ हा तोच जुना विनोद वापरण्यात आला आहे.

’क्या सुपरकूल है हम’ या चित्रपटातील सगळे विनोद संवादात आहे. चित्रपटातील संवाद कॉमेडी लेखन करणार्‍या लेखकाने ठिकठाक लिहिले आहेत. हास्य कवी संमेलनात हे विनोद निश्चितच चालणारे आहेत. चित्रपटातील दुहेरी अर्थ असणार्‍या संवादाबद्दल तर विचारुच नका. एकच अर्थ वारंवार वापरुन प्रेक्षकांच्या डोक्याचे दही करण्यात आले आहे. इथेच हा चित्रपट टाय टाय फिस होतो. कारण चित्रपटाला जाणूनबुजून ताणल्या गेल्यामुळे चित्रपटाची कहाणी कुठेच शिल्लक राहत नाही.

खरे बोलायचे झाल्यास, हा चित्रपट क्रिटिक्सच्या नजरेत फालतू वाटेल असे चित्रपटाच्या निर्मात्यांनीच पोस्टरच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे की काय असे वाटते. शेवटी क्रिटिक्सही सामान्य प्रेक्षकांपेक्षा काही वेगळे नसतात. त्यांनाही चित्रपट पाहून आनंदी व्हायचे असते. कारण त्यांनाही चित्रपट पाहायला आवडतो.

Leave a Comment