दीपिकासोबत स्पर्धा नाही- एवलिन शर्मा

इंटरनॅशनल मॉडेल एवलिन शर्मा हिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्याला फारसा काळ लोटला नसला तरी बॉलीवूड मध्ये तिने चागलाच जम बसवला आहे. अर्थात तिला नशिबाचीही साथ आहे असे वाटते. कारण अन्य विदेशी चेहऱ्याच्या तुलनेत तिने चटकन बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

फ्रॉम सिडनी विथ लव या चित्रपटानंतर तिच्याकडे रणबीर दीपिकाचा ये जवानी है दिवानी, प्रतिक सोबतचा इश्क हे चित्रपट आहेतच पण आयुष्मान खुराना, कुणाल कपूर सोबत अजून नाव न ठरलेल्या चित्रपटातून ती झळकणार आहे. भारतात आल्यानंतर पाच चित्रपट तिला मिळाले आहेत.

याबाबत एवलिनची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ती म्हणाली की, मी तर याबाबतीत देवाचे आभार मानते. येथे मला काही चांगले लोक भेटले. त्यांच्यामुळे मला पाच चित्रपटात काम मिळाले आहे. मी ही ऑडिशनसाठी गेले होते. त्यामध्ये मी नशीबवान ठरले.

दीपिका पदुकोनसोबत तुझी स्पर्धा आहे का असे विचारल्यानंतर ती म्हणाली की, दीपिकाच काय अन्य कुठल्याही अभिनेत्रीशी माझी स्पर्धा नाही. माझे व दीपिकाचे काम वेगवेगळे असून प्रत्येक चित्रपटात मी वेगळ्या स्वरुपाची भूमिका साकारत आहे.

Leave a Comment