जिस्म -२

‘बिग बॉस’या रिऍलीटी शो मुळे सनी लियोन हे नाव भारतीय प्रेक्षकांना माहिती झाले. पाश्‍चिमात्य देशातील प्रत्येक गोष्टीची कॉपी करणार्‍या भट्ट कॅम्पने या पोर्नस्टारला अभिनयाची संधी दिली.’जिस्म -२’ची नायिका म्हणून सनीच्या नावाची घोषणा झाली. तेंव्हापासून प्रेक्षक सनीला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

‘जिस्म -२’बद्दल सांगायचं तर ही एका मुलीची कथा आहे. चित्रपटाची सुरूवात एका डिस्कोथेकमधून होते. तिथे इज्ना (सनी लियोन) एका तरुणा (अरुणोदय सिंग) बरोबर जाते. इज्नाबरोबर रात्र घालवल्यानंतर तिला पैसे न देतो तिच्यासमोर एक ऑफर ठेवतो. ती काय काम आहे हे न विचरता आपल्याला या कामासाठी दहा कोटी रूपये मिळायला हवेत असे सांगते. त्यानंतर तीला समजते की आपला एक्स बॉयफ्रेंड कबीर विल्सन (रणदिप हुडा) याच्याकडून गुप्त माहिती मिळवायची आहे. कबीर आणि इज्ना समोरासमोर आल्यास काय घडते? याची उत्सुकता प्रेक्षकांना येते ती मात्र त्यांच्यातील हॉटसिन्स पहाण्यासाठीच.

कबीर श्रीलंकेतील एका पंचतारांकित रिसोर्टमध्ये एकटाच वास्तव्याला असतो. आपल्या या गुप्त ठिकाणाहून तो आपल्या कायवाया घडवून आणतो. आज दहशतवादी कृत्ये करत असला, तरी कबीर पुर्वाश्रमीचा इमानदार पोलिस ऑफिसर आहे. इज्नाच्या आयुष्यातून तो अचानक निघून जातो. तिच्या आयुष्यात त्याचे काहीच स्थान उरत नाही. त्याच्याबरोबर काय झाले हे जाणून घेण्यासाठी ती मुळीच उत्सुक नाही. मात्र ज्यावेळी त्याच्याकडे जायची वेळ येते तेंव्हा मात्र तिच्यातील बदले की आग जागृत होते. ती का आणि कशी हे फक्त दिग्दर्शकाला माहिती.

`आय ऍम पोर्न स्टार’ याने चित्रपटाची सुरुवात होते. यामुळे चित्रपटात काय – काय पहायला आणि ऐकायला मिळेल याची आपल्याला पुरेपूर कल्पना येते. सनीसारख्या अभिनेत्रीला घेऊन चित्रपट काढला तर प्रेक्षकांच्या अपेक्षा काय असू शकतात याचा पूर्ण विचार करून पुजा भट्टने सनीकडून भरपूर अंगप्रदर्शन करून घेतले आहे. ज्या पद्धतीने सनीने हॉत सिन्स दिले आहेत, ते पहाता सध्याची बॉलिवुड मधली कोणतीही बोल्ड अभिनेत्री ही भूमिका करू शकली नसती याची पुरेपूर कल्पना येते. सनीने पूजाचा विश्‍वास सार्थ ठरवला आहे. सनीच्या अभिनयाविषयी न लिहिलेलेच अधिक उत्तम.

चित्रपटात सनी लियोन आहे म्हणजे प्रेक्षक येणार हे गृहीत धरून निर्माता – दिग्दर्शक असलेल्या पुज भट्टला कथेवर कोणत्याही प्रकारचे काम करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. म्हणुनच पहिल्या काही दृष्यानंतर हा चित्रपट कधी संपतो याची वाट प्रेक्षक बघतात. हॉटसिन्सचा भडीमार असला तरी प्रेक्षकांना खिळवुन ठेवेल अशी कोणतीही गोष्ट ‘जिस्म – २’मध्ये नाही. इज्नाला कबीरपर्यंत पोहचवण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत. कबीर आणि आयान यांच्यातील धुसफूस. मध्येच येणारे दहशतवादावरील लेक्चर, गुरू अशा प्रकारामुळे प्रेक्षक कथेशी नाळ जूळवू शकत नाही. कथेत दम नसला तरी संवाद परिणामकारक वापरण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येक संवादामधुन पडद्यावर जे दाखवायचे आहे त्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे.

कलाकारांमध्ये रणदिप हुड्डाचा अपवाद सोडला, तर अभिनयाची बोंब आहे. ‘जिस्म २’च्या छायाचित्रणासाठी निवडलेले लोकेशन छान आहे. छायांकन ही उत्तम झाले आहे. काही प्रेक्षकांना हा भट्ट कॅम्पचा डर्टी पिक्चर आवडेल अशी अपेक्षा होती; मात्र आता ती सुद्धा शक्यता नाही.

Leave a Comment