मंगळावर रोवर उतरण्याचे थेट प्रसारण

न्युयॉर्क,दि.२ – मंगळ गृहावर अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे रोबोटिक वाहन क्यूरोसिटी रोवर उतरण्याचे थेट प्रसारण येथील निवासी पाहु शकतील. नगरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ टाइम्स स्क्वायरवर याला मोठ्या स्क्रीनवर दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रोवरवर २.५ अब्ज डॉलर (सुमारे १३८ अब्ज रुपये) खर्च आला आहे. हे नासाचे सर्वात महाग मंगल मिशन आहे. याच्या लँडिंगवर जगभराची नजर टिकलेली आहे.

वायुमंडळाजवळ पोहचलेले क्यूरोसिटीची गती सध्या १३,००० मैल (२०,८०० किमी) प्रति तास आहे. लँडिंगदरम्यान सात मिनिटाच्या आत याची गती शुन्यावर आणावे लागेल. जर असे झाले तर मिशन यशस्वी होण्याची शंका वाढेल.

नासाच्या विज्ञान मिशनासाठी असोसिएट ऍडमिनिस्ट्रेटर जॉन ग्रुन्सफेल्डने सांगितले, ’नगरचा निवासी या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रसारण पाहु शकतील. मंगळावर उतरणार्‍या रोवरचे प्रसारण करण्यासाठी यापेक्षा चांगले ठिकाण असु शकत नाही.’ मंगळावर क्यूरोसिटी सहा ऑगस्टला उतरणार आहे. हे सुमारे दोन वषापर्यंत मंगळवर संशोधन करेल. हे लाल गृहावर जल व जीवनाच्या शक्यतेबाबत माहिती लावेल. क्यूरोसिटीला नोव्हेंबर, २०११ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. हे मंगळवर उतरण्याचे प्रसारण नासाचे कॅलिफोर्निया स्थित जेट प्रोपल्शन लेबोरेट्रीच्या मिशन कंट्रोलने केले जाईल. यानेच रोवरला डिझाइन केले असून हेच मिशनची व्यवस्था करीत आहे.

Leave a Comment