इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचा कांगावा करून पाकिस्तानने यासंबधी खटला चालविण्यास नकार दिला आहे.

इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचा कांगावा करून पाकिस्तानने यासंबधी खटला चालविण्यास नकार दिला आहे.
भारताने २६/११ संदर्भात पाकिस्तानला अनेक पुरावे सुपूर्द केले असून या हल्ल्याच्या कटात सहभागी असणार्या सात संशयित दहशतवाद्यांची नावे दिली आहेत. त्यात कुख्यात अतिरेकी लष्कर ए तैय्याबाचा संस्थापक झाकीर रेहमान लख्वी याचाही समावेश आहे.
मात्र हे पुरावे अपुरे असून खटला उभा करण्यासाठी अधिक सबळ पुरावा आवश्यक असल्याचे पाक लष्कराच्या वकिलाने सांगितले. पाकिस्तान सरकारने हा खटला पुराव्या अभावी चालवू शकत नसल्याचे भारतालाही कळविले आहे.