दह्शतवादी ह्ल्ल्यांबाबत पूर्वसूचना मिळवूनही महाराष्ट्र शासन उदासीन

पुणे,दि.२ – केंद्रिय गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्रातून दहशतवादी हल्ले होण्याची सूचना देऊनही महाराष्ट्र सरकारने या सूचनेची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे पुण्यातील बॉम्बस्फोट झाल्याचा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

खडसे यांनी पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे, रिपब्लिकन पक्षाचे राजकीय अध्यक्ष रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरातील जगप्रसिद्ध गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव याच्या पार्श्‍वभूमीवर हा स्फोट घडविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवनियुक्त गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भीती दाखविणे, हा देखील या स्फोटामागील उद्देश असू शकतो, असे मत खडसे यांनी व्यक्त केले. नजीकच्या भूतकाळातील बॉम्बस्फोटाची ही राज्यातील १६ वी घटना असून, सरकार याबद्दल गंभीर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यातील सुरक्षता येत्रणेसाठी बसविलेले सीसीटीव्ही हे बंद असून, राज्यातील सुरक्षा यंत्रणा गाफील असल्याचा आरोप निलम गोर्‍हे यांनी केला.

गुप्तचर विभागाने पूर्व सूचना देऊनही पुण्यासारख्या सुरक्षित शहरात बॉम्बस्फोट होणे हे राज्याच्या गृहविभागाचे अपयश असण्याची टीका आठवले यांनी केली.

या बॉम्बस्फोटाच्या समांतर तपासासाठी मुंबईतील दहशतवादी विरोधी पथकाचे (एसआर) पोलीस आणि राष्ट्रीय प्रवास यंत्रणेचे पथक गुरुवारी पहाटे पुण्यात दाखल झाले आहे.

Leave a Comment