चेन्नई एक्सप्रेसचे शुटींग सप्टेंबरमध्ये सुरू

रोहित शेट्टीचा बोल बच्चन चांगलाच हिट ठरल्याने आता त्याच्या वरील जबाबदारी वाढली आहे. रोहितने त्याचा शाहरुख खान सोबतचा बहुचर्चित चित्रपट चेन्नई एक्सप्रेसचे शुटींग सप्टेंबरपासून सुरु करण्याचे ठरविले आहे. खरेतर या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात होणार होते मात्र शाहरुखच्या सांगण्यावरून रोहितने हा बदल केला असल्याचे समजते.

ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत चॉम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शाहरुखाच्या मालकीचा कोलकत्ता नाइट रायडर्स संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी शाहरुख संघासोबत दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. यामुळेच त्याने चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबरमध्ये सुरु करण्यास सांगितले आहे.

सप्टेंबरच्या १ तारखेला या चित्रपटासाठी महेबूब स्टुडीओमध्ये मोठा सेट उभारण्यात येणार आहे. शुटिंगचे काम ४० दिवस म्हणजेच ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चालणार आहे. नोवेंबर महिन्यात रोहितच्या बहिणीचे लग्न असल्याने त्याला मोठी सुट्टी घेता येणार असल्याने तो सध्या खूष आहे.