कश्यप पोहचला क्वार्टर फायनलमध्ये

ओलोम्पिक स्पर्धेतील बॅडमीटनमध्ये भारताच्या पारुपल्ली कश्यप याने दमदार कामगिरी करत साखळी सामन्यात श्रीलंकेच्या नीलका करुनारात्ने याचा पराभव करीत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारणारा तो आतापर्यंतचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी महिला बॅडमीटनपटू असलेल्या सायना नेहवालने बीजिंग येथील ओलोम्पिक स्पर्धेत अंतिम आठजनापर्यंत मजल मारली होती.

ओलोम्पिक स्पर्धेतील बॅडमिटन स्पर्धेच्या साखळी सामन्यात कश्यपने श्रीलंकेच्या करुनारत्नेचा २१-१४, १५-२१, २१-९ असा पराभव केला. कश्यपने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये श्रीलंकेच्या करूनरत्नने २१-१५ असा जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली होती. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती, मात्र तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून पखड निर्माण करीत २१-९ अशा फरकाने गेम जिंकत कश्यपने हा सामना जिंकला.

यापूर्वीच्या सामन्यात २५ वर्षीय कश्यपने ११ व्या क्रमांकावरील निगुयेन याचा दोन सरळ गेममध्ये २१-९, २१-१४ असा पराभव करून धक्का दिला होता. त्यापूर्वी कश्यपने सुरुवातीच्या सामन्यात बेल्झियमच्या तन युहान याचा पराभव करून या स्पर्धेतील विजयी अभियानास सुरुवात केली होती. त्यामुल आता पुढील सामन्यात कश्यपाचा कस लागणार असून तिच्या या जिगरबाज खेळीमुळे त्याच्याकडून पदकाची अपेक्षा वाढली आहे.

Leave a Comment