संजय दत्त व मान्यता झळकणार जाहिरातीत

बॉलीवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी येईल हे सांगणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. गेल्या काही दिवसापासून येथे पती-पत्नीने एकत्र जाहिराती करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या पती पत्नीने नुकतीच केलेली जाहिरात आपल्याला आठवत असेल. आता संजय दत्त व मान्यता या दोघानीही शिल्पा आणि राजच्या पावलावर पाऊल टाकत एका जुवेलरी ब्रांडसाठी एकत्र जाहीरात केली आहे.

रविवारीच संजय दत्तने त्याचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. वाढदिवसा निमित्त त्याने काही मुलांना भेटवस्तू दिल्या.त्यानंतर संजयने सर्व रूटीनची कामे बाजूला ठेऊन मान्यतासोबत ज्वेलरी ब्रांडसाठीच्या या जाहिरातीचे शुटींग पूर्ण केले.

गेल्या काही दिवसापासून संजय दत्तच्या घरात दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळेच दोघानी बाहेरच वाढदिवस साजरा केला असल्याचे समजते. याच कारणास्तव काही दिवसापूर्वी मान्यतानेही तिचा वाढदिवस कसलीच पार्टी आयोजित न करता साधेपणाने साजरा केला होता.

Leave a Comment