नवी दिल्ली: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली.
सुमारे अर्धा तास झालेल्या या चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. मात्र या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असलेल्या मतभेदाच्या मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठीना माहिती दिली. त्याचप्रमाणे पक्षांतर्गत कुरघोड्या आणि कुरबुरी याबाबतही त्यांनी पक्षाध्यक्षांना सविस्तर कल्पना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.