मंत्रालयाच्या दुरुस्तीसाठी समिती नियुक्त

मुंबई: मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर करावयाच्या दुरुस्त्या आणि सुधारणांचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी राज्य शासनाने समिती नियुक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता डी. टी. ठुबे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला दि. २१ जून रोजी भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत झालेल्या हानीचा अभ्यास करून तांत्रिक तज्ज्ञ समितीने अनेक सुधारणा आणि दुरुस्त्या सुचविल्या आहेत.

नव्याने नियुक्त करण्यात आलेली समिती तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा अभ्यास करून या कामांना मान्यता देणे आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेऊन कामे नियोजित वेळेत करून घेणे हे काम करणार आहे. कार्यकारी अभियंता व्ही. पी. रामगुडे, शैलेंद्र बोरसे, किशोर पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.

Leave a Comment