न्यूयॉर्कचे प्लाझा हॉटेल सहाराने खरीदले

तेलअवीव दि.३१ – न्यू यॉर्कचा लँडमार्क असलेले प्लाझा हॉटेल भारतीय सहारा समुहाने ५७० दशलक्ष डॉलर्सना खरेदी केले असून त्यासंबंधीचा करार सोमवारी करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इस्त्राईलच्या मालकीची एलाड प्रॉपर्टीज आणि सौदीची किंगडम होल्डींग्ज कंपनी यांची या हॉटेलमध्ये भागीदारी होती. १०५ वर्षांचे हे जुने हॉटेल न्यू यॉर्क च्या प्रतिष्ठित सेंट्रल पार्कजवळ आहे.

इस्त्रायलच्या कंपनीचे मालक उद्योगपती त्सुवा यांचा या हॉटेलात ६० टक्के वाटा असून बाकी वाट्यातील २५ टक्के  सौदीच्या किंगडम होल्डींगचे मालक सौदी अब्जाधीश प्रिन्स अल्वालिद बिन तलाल यांच्याकडे  व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही राहणार आहे. आठ वर्षांपूर्वी हे हॉटेल ६५७ दशलक्ष डॉलर्सना खरेदी करण्यात आले होते मात्र त्यातील लक्झरी अपार्टमेंट एलाड कंपनीने यापूर्वीच १.५ बिलीयन डॉलर्सला विकले असल्याचे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. या व्यवहारातून एलाडने ५०० दशलक्ष डॉलर्सचा फायदा मिळविला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment