लंडन, ३० जुलै-भारताचा बॉक्सिर विजेंदर कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे. ७५ किलो वजनी गटात विजेंदरने साखळी सामन्यात कझाकस्तानच्या डॅनाबेक सुखानोव्हचा सहज पराभव केला.

लंडन, ३० जुलै-भारताचा बॉक्सिर विजेंदर कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे. ७५ किलो वजनी गटात विजेंदरने साखळी सामन्यात कझाकस्तानच्या डॅनाबेक सुखानोव्हचा सहज पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच विजेंदरने प्रतिस्पर्ध्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि तीन राऊंडमध्ये १४-१० असा विजय साजरा केला. पहिल्याच राऊंडमध्ये विजेंदरन आक्रमक पवित्रा घेतला आणि ५-४ असा जिंकून घेतला. तर त्यानंतर इतर दोन राऊंडमध्येही त्याने सुखानोव्हवर सहज मात केली.
या विजयाबरोबर विजेंदरने आता उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विजेंदरचा पुढचा सामना आता दोन ऑगस्टला होईल. उपउपांत्य फेरीत विजेंदरचा मुकाबला अमेरिकेच्या टेरेल गॉशाविरूद्ध असेल. त्यामुळे बीजिंग ऑलिम्पिकचा हीरो ठरलेल्या विजेंदरकडून आताच्या लंडन ऑलिम्पिकमध्येही मोठ्या आशा आहेत.