बॅटमॅन

तुमचा जरी बॅटमॅनवर विश्वास नसला तरीदेखील मी आत्ताही बॅटमॅनवर विश्वास ठेवतो, असे सर्जेट नावाचा एक तरुण अब्जाधीश ब्रुस वेनला(क्रिश्चियन बेल) म्हणतो. खरे तर हा तरुणच बॅटमॅन असतो. श्रीमंत वेन हा एका पायाने अपंग असून, गेल्या कित्येक वर्षांपासून त्याने स्वतःला आपल्या घरातील चार भिंतीतच कैद करुन ठेवले आहे. अचानक एके दिवशी त्याच्या गोथम शहराला त्याची गरज भासते. स्पष्टच आहे की, दर्शकांनाही त्याची गरज भासते.

आता हा फत्त मुलांचा चित्रपट राहिलेला नाहीए. या चित्रपटातील गंभीर भ्रमपूर्ण विषयाशी लहान मुले स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही. बॅटमॅन आता एक धर्म बनला आहे. याअर्थाने दिग्दर्शक क्रिल्टो फर नोलनला आधुनिक काळाचा वाल्मिकी म्हणायला हवे.
तीन महत्त्वाच्या गोष्टीत नोलन यांनी फेरबदल केलेले नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही एक सुपरहिरो बेस्ड फिल्म आहे. त्यामुळे या चित्रपटात एक सुपर हिरो असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटात एक कट्टर शत्रू असणेही महत्त्वाचे आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॅटमॅनला या पागल शत्रूच्या क्रुर शक्तींच्या विरोधात युद्ध करुन जगाला वाचवायचे आहे. या तिन्ही गोष्टी या चित्रपटात कायम आहेत.

’द डार्क नाईट’ या चित्रपटात दिग्दर्शकाने हे उत्तमरित्या साकारले होते. कदाचित म्हणूनच बॅटमॅन सिरिजच्या या तिसर्‍या भागालाही दिग्दर्शकाने उत्कृष्टपणे हाईप केले आहे. मात्र एवढ्या हाईपची खरचे गरज होती का ? कदाचित कोणत्याच हाईपला एवढे फायदेशीर समजू नये ? तर मग हा सिनेमा ओवर रेटेड आहे का किंवा होऊ शकतो का ? ही तर रेटिंगची अडचण आहे, या चित्रपटाची नाही.
खरे तर मी उशीरा उठतो, मात्र डार्क नाईटचा पहिला शो बघण्यासाठी मी लवकर उठलो. जगातील बॅटमॅनच्या चाहत्यांनीही हेच केले असावे, असे मला वाटते. या चित्रपटाचे चाहते कमी नाहीत.
बॅटमोबाईल आणि आता बॅटसायकल व्यतिरिक्त या बॅटमॅनजवळ जे आहे ते म्हणजे हा सुपरहिरो स्वतःचा चेहरा मास्कने झाकून ठेवत नाही. म्हणूनच हा बॅटमॅन इतर सुपर हिरोंपेक्षा वेगळा ठरतो. हा बॅटमॅन सामान्य माणसांसारखा आहे. गोथम सिटीवर अँटमीचे संकट आहे. या चित्रपटातील व्हिलेनचा श्रीमंत लोकांवर राग आहे. हा चित्रपट वर्ग संघर्षाची कहाणी सांगणारा आहे.
हा व्हिलेन पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करतो. त्यानंतर तुरुंगात असलेल्या दोषींची सुटका करतो. फुटबॉल मैदान उद्धवस्त करतो. शिवाय संपूर्ण शहराचा अँटमीमार्फत नायनाट करण्याचा त्याचा उद्देश असतो. अर्थातच एका संपूर्ण शहराला संपवणे म्हणजेच लोकांना मारण्याचे त्याचे ध्येय असते. हा नायनाट करतांना हा व्हिलेन ज्यांच्यासाठी हे सगळे करतोय त्यांचाही खातमा करणार हे उघडच आहे. मात्र हे दुसरे प्रकरण आहे.

हा चित्रपटाचा दुसरा भाग आहे. यामुळे प्रेक्षक त्यांच्या जागेवरुन हलतही नाहीत. डार्क गोथम शहराचे रुपांतर अगदी सोप्या रितीने मुंबई किंवा न्युयॉर्क शहरात होऊ शकते. हे दृश्य जेवढे भयावह आहे, तेवढेच ते मजेशीर देखील आहे. हे दृश्य पाहून आपण स्तब्ध होऊन जातो.
बॅटमॅन चित्रपटांप्रमाणचे हा चित्रपट पूर्णपणे व्हिलनभोवती फिरतो. मात्र तरीसुद्धा आणखी काही व्यत्तरेखा या चित्रपटात आहेत. ज्याचा चेहरा अर्धवट झाकलेला असतो असा बॉडी बिल्डर बेन (टॉम हार्डी) इतक्या अस्पष्टपणे बोलतो की, त्याला काय म्हणायचे आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. हीथ लेजर अविस्मरणीय जोकरच्या रुपात आपल्या भेटीला येतो. बेनचे बॅटमॅनपेक्षा अधिक शक्तिवान असणे, तसे पाहता निराशजनक वाटते. कदाचित बेनचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली ठरले नसल्यामुळे लेखकाने इतर कॅरेक्टर्सची निर्मिती करुन ती पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे.
नवीन कॅरेक्टर्समध्ये सुंदर चोर कॅटवुमन (एनी हॅथवे), एक श्रीमंत मिस्टजर टेल (मारियन कोटिलार्ड) आणि याशिवाय माइकल केल (अल्फ्रेड द बदलरच्या भूमिकेत), मार्गन फ्रीमॅन (लुसियस फॉक्सच्या भूमिकेत) आणि गॅरी ओल्डमन (गोथम सिटीच्या कमिश्नरच्या भूमिकेत) यांचा समावेश आहे.

यापैकी एकही भूमिका आपल्याला हसवण्यात यशस्वी होतांना दिसत नाही. खरे तर प्रेक्षक कॉमेडी चित्रपट पाहायला थिएटरमध्ये आलेला नाही. मात्र तरीही थोडासा डार्क ह्युमर चित्रपटासाठी फायदेशीर ठरला असता. ‘एवढे गंभीर होण्याची गरज ती काय ?‘ कदाचित मी या चित्रपटाची तुलना ’द डार्क नाईट’बरोबर करत आहे. मात्र तुलना करण्यात गैर ते काय ?

Leave a Comment