
ओडिशा: ब्राम्होस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राने ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर येथील युद्धनौकेवरून जमिनीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
ओडिशा: ब्राम्होस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राने ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर येथील युद्धनौकेवरून जमिनीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
कॉम्प्लेक्स-३ या युद्धनौकेवर ब्राम्होस या जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ब्राम्होस हे क्षेपणास्त्र ३०० किलो स्फोटके वाहून नेऊ शकते तर २९० किलोमीटर अंतर कापण्याची त्याची क्षमता आहे.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता घेतलेल्या चाचणीत ब्राम्होसने अचूक लक्ष्यभेद केल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली.