शर्टलेस सलमान

सलमान खान त्याच्या चित्रपटात एक ना एक तरी शॉट तो शर्ट काढून करतो असतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळेच सलमानने यामध्ये खंड न पडू देता एक था टायगर चित्रपटातही त्याचा आवडता शर्टलेस सीन केला असल्याचे समजते. या चित्रपटात तो रॉ एजंटाची भूमिका करीत आहे. मात्र त्याच्या काही फॅनसना हा शर्टलेस शॉट आवडत असल्याने त्यांच्यासाठी हा सीन त्याने केला आहे.

सलमानचा हा शर्टलेस सीनचे शुटींग गेल्या आठवड्यातच यशराज स्टुडिओमध्ये करण्यात आले. सुरुवातीच्या काळात अशा प्रकारचा काही सीन करण्याचे ठरले नव्हते मात्र सलमानच्या काही चाहत्यांना हा सीन आवडत असल्याने त्याचा या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे.

एक था टायगर चित्रपटात सलमानची भूमिका गुप्तहेराची आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे या चित्रपटात तशी शर्टलेस सीनची काही आवश्यकता नव्हती. मात्र सलमान व त्याच्या चाहत्यासाठी हा सीन म्हणजे आता ट्रेड मार्कच झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ईद दिवशी रिलीज होणार असल्याने सलमानने त्याच्या फॅनससाठी ही विशेष भेट दिली आहे. सलमानने ही शर्टलेस सीन अॅड करण्याची कल्पना निर्माता आदित्य चोप्राला व दिग्दर्शक कबीर खानला सांगितली. त्या दोघांना ही आयडिया चांगलीच आवडल्याने हा सीन लगेचच पूर्ण करण्यात आला.

Leave a Comment