वकार युनिसचा कोच होण्यास नकार

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाना कोचिंग करण्यास पाकच्या माजी जलदगती गोलंदाज वकार युनिसने नकार दर्शविला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कोच क्रेग मेंकडरमेटने मे महिन्यात हे पद सोडल्यापासून नवीन कोचचा शोध घेतला जात आहे.

या पदासाठी वकार युनिसचे नाव आघाडीवर होते. इतकेच नव्हे तर त्याची निवड निश्चित मानली जात होती. मात्र वकार युनिस व ऑस्ट्रेलिया संघात झालेली बोलणी फिस्कटल्यामुळे वकारने कोच होण्यास नकार दर्शविला असल्याचे समजते. मी ऑस्ट्रेलिया संघासाठी जे करू इच्छित होतो त्यामध्ये व त्याच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षामध्ये बरेच अंतर असल्याने ही बोलणी फिस्कटली असल्याचे वकारने एका मुलाखतीप्रसंगी सांगितले.

१४ वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत वकारने ३७३ विकेट घेतल्या आहेत. काही काळ त्याने पाकिस्तान संघाचा कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या तो सिडनी येथे ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूना गोलंदाजीचे प्रशिक्षण देत आहे. त्यासोबतच क्रिकेट समालोचक म्हणून ही तो गेल्या काही दिवसापासून काम करीत आहे. या कामामध्येच तो अजून काही महिने तरी व्यस्त असेल असे वकारने सांगितले.

Leave a Comment