
आपली बंगाली मुलगी राणी मुखर्जी आजकाल फारशी कोठे दिसत नाही. बरेच दिवसांत तिचा नवीन चित्रपटही आलेला नाही. यामागे तिचा प्रियकर आणि निर्माता आदित्य चोप्राच कारणीभूत आहे असेही सांगितले जात आहे. अर्थात या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही इतकेच काय दोघेही कधी कुठल्या कार्यक्रमाला एकत्र गेलेलेही दिसलेले नाही. प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही त्यांना अजून पकडू शकलेले नाहीत. मात्र असे असले तरी प्रसारमाध्यमातून अशा बातम्या येत आहेत की हे दोघे सुट्ट्या एकत्र घालवितात तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही एकत्रच जातात. राणी अशी आदित्यमधे गुंतल्यानेच कदाचित नवीन चित्रपट स्वीकारत नसावी.
