महिंद्राची ‘व्हेरिटो’ बाजारात

नवी दिल्ली, दि.२७ – `महिंद्रा अँड महिंद्रा’ने वाहन उत्पादनातील सेदान प्रकारातील व्हेरिटोची नवीन श्रेणी बाजारात दाखल केली आहे.

पेट्रोल आणि डिझेल प्रकारातील या मोटारीची किंमत अनुक्रमे ५.२७ लाख आणि ७.१७ लाख आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा या मोटारीची किंमत १९ हजारपर्यंत जास्त आहे. मात्र, नवीन श्रेणी बाजारात आल्यामुळे आधीच्या मोटारींचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. व्हेरिटोची नवीन श्रेणी सध्या सेदान प्रकारातील डिझायर आणि इतिओस या मोटारींना स्पर्धा करेल, असे कंपनीने म्हटले आहे.