शिवसेनाप्रमुख आयसीयूमध्ये

मुंबई: श्वसनाच्या त्रासामुळे लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यंची रवानगी अति दक्षता विभागात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ही बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. शिवसैनिकांनीही रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

बद्धकोष्ठ आणि त्यापाठोपाठ श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बाळासाहेबांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तपासण्या केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल; असे वैद्यक तज्ज्ञांनी सांगितले होते. मात्र विश्रांती आणि नियमित तपासण्यांसाठी त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी प्रकृती काहीशी खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले

Leave a Comment