मोहम्मद समी कमजोर गोलंदाज- शोएब अख्तर

पाकिस्तान संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद समी हा मानसिकरित्या प्रबळ असा गोलंदाज नसल्याचे मत रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने व्यक्त केले. या त्याच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर शोएब अख्तरने क्रिकेटमधून सन्यास घेतला होता.

एकेकाळी पाक गोलंदाजीचा कणा असलेल्या शोएबच्या मते, मी आणि समी याने मिळून पाक संघाच्या जलदगती गोलंदाजीची अनेक सामन्यातून सुरुवात केली आहे. मात्र त्याची गोलदाजी फारशी प्रभावी अशी कधीच वाटली नाही. मी विकेट घेण्यासाठी आक्रमक गोलंदाजी करीत होतो तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूने समी विकेट घेण्यासाठी अक्षरशा झुंजत होता. त्यामुळे मला त्याची गोलंदजी कधीच आक्रमक वाटली नाही. सध्या काही खेळाडूकडून त्याला कराची एक्सप्रेस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ मला संघात प्रतिस्पर्धी तयार व्हावा या उद्देशाने त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला असल्याचा गौप्यस्फोट शोएबने यावेळी केला.

या शोएब अख्तरने केलेल्या विधानानंतर पाकमध्ये खळबळ माजली आहे. त्याने केलेल्या या आरोपामुळे पाकिस्तान संघातील काही खेळाडूबद्दल मात्र पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment