गोळीबारात जखमी गर्भवतीने दिला गोंडस बाळाला जन्म

कोलोरेडो: कोलेरेडो थिएटरच्या गोळीबारातून केवळ जखमी होण्यावर निभावलेल्या २१ वर्षाच्या केट मेडलेने एका गोंडस मुलाला मंगळवारी जन्म दिला. त्याच दवाखान्यात तिचा पती उपचार घेत असून तो या गोळीबाराच्या घटनेत डोक्याला गोळी लागून जखमी झाल्यामुळे कोमात आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा केट मेडले व तिचा पती कालेब दोघंही बेटमनच्या पोशाखात थिएटरमध्ये हजर होते.

विनोदी नट असलेला कालेब मेडले २३ वर्षाचा असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तो युनिवर्सिटी कोलोराडो डेनवर या हॉस्पिटल मध्ये उपचार घेतोय. गोळीबारात त्याचा डावा डोळा निकामी झाला आहे व मेंदूला गंभीर इजा झाली आहे. मात्र त्याची पत्नी व नुकताच जन्मलेला मुलगा ह्युगो जाक्सन मेडले या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

Leave a Comment