कॉकटेल

चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा चित्रपट म्हटलं की, चित्रपटाच्या नायक-नायिकेचे प्रेमाविषयीचे कन्फ्युजन आणि लांबत चाललेला शेवट या दोन गोष्टी आठवतात. ‘कॉकटेल’चा दिग्दर्शक होमी अदजानिया असला तरी हा चित्रपट लेखकाच्या भूमिकेत असलेल्या इम्तियाज अलीच्याच स्टाइलचा आहे, त्याचीच पूर्ण छाप दिसते.

‘कॉकटेल’ची कथा आहे वेरोनिका (दीपिका पदुकोण), मीरा (डायना पेंटी) आणि गौतम कपूर (सैङ्ग अली खान) यांच्यातल्या मैत्रीची व प्रेमाच्या त्रिकोणाची. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला गौतम त्याला भेटणार्‍या प्रत्येक मुलीशी फ्लर्ट करत असतो. दिल्लीहून लंडनमध्ये कामानिमित्त तो जातो. दुसर्‍या बाजूला वेरोनिका आणि मीरा या दोघींची भेट मध्यरात्री एका कॉङ्गीशॉपच्या वॉशरूममध्ये होते. मीरा आपल्या नवर्‍याकडे भारतातून लंडनला आलेली आहे;परंतु तो तिला झिडकारतोयामुळे ती उदास आहे. त्यावेळी नशेत धुंद असेलेली वेरोनिका उदास असलेल्या मीराला आपल्या घरी घेऊन येते. एक अतिशय बिन्धास्त, तारुण्याच्या आणि अमलीपदार्थांच्या नशेत जगणारी आणि दुसरी साधी भोळी अशी टीपीकल देसी गर्ल आहे. दरम्यान, या दोघींमध्ये चांगली मैत्री होते.

या दोन मैत्रिणींच्या नात्यात गौतमची एन्ट्री होते. अर्थात फ्लर्ट करणारा गौतम बिनधास्त वेरौनिकाचा बॉयङ्ग्रेंड आहे. गौतमला गर्लङ्ग्रेंड असल्याचे कळल्यावर त्याची आई कविता (डिपल कपाडीया) भारतातून लंडनला येते. तिच्या मनातील टिपिकल इंडियन बहू कशी असेल याची कल्पना असलेला गौतम वेरोनिका ऐवजी मीराची ओळख गर्लङ्ग्रेंड म्हणून करून देतो आणि मग टिपिकल हिदी चित्रपटाप्रमाणेच ‘कॉकटेल’मध्येही प्रेमाचा त्रिकोण सुरू होतो.

इम्तियाज अलीने लिहिलेल्या कथेमध्ये कोणत्याही प्रकारचे नावीन्य नाही. लव्ह टँगलवर आजपर्यंत असंख्य चित्रपट आले आहेत. नायकाचे एका नायिकेवर प्रेम आहे, तर दुसरी नायिका त्या नायकावर प्रेम करते किवा याच प्रकारात नायकाच्या जागी नायिका असते. दोघात तिसरा आल्यानंतर होणारा मैत्रीतील तणाव, हेवेदावे, मैत्रीसाठी आपल्या प्रेमाची कुर्बानी अशा सर्व बाबींचे ‘कॉकटेल’ यातून घडते. चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसे प्रेक्षकांनाही चित्रपटाचा शेवट काय असेल याचा अंदाज येतोच. नव्या बाटलीत जुनीच दारू भरलेली असली तरी किमान त्याला काही नावीन्याचा साज चढविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला दिसत नाही, त्यामुळे प्रेक्षक कथेशी एकरूप न होता एकदा चित्रपट कधी संपतो याची वाट बघतो.

फ्लर्टिंग करणार्‍या गौतमच्या भूमिकेत सैङ्ग अली खान उत्तम बसला आहे. त्याचा अभिनयही चांगला आहे; मात्र काही दृश्यांमध्ये त्याचे भूमिकेच्या तुलनेने जास्त असलेले वय त्याचा कॅमेरामन लपवू शकला नाही. वेरोनिका या बिनधास्त मुलीच्या भूमिकेवर दीपिकाने आपली छाप सोडली आहे. तिच्या अभिनयात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसते. उच्चशिक्षित, हायङ्गाय कल्चरमध्ये वावरणारी तरीही टिपिकल इंडियन देसी गर्ल असलेली मीरा डायना पेंटीने साकारली आहे. तिने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. बोमण इराणी, डिपल कपाडीया, रणदीप हुडा यांच्या भूमिकाही लक्षात राहतात.

लंडनच्या नयनरम्य लोकेशन्स नेत्रसुखद आहेत. तरुणाईला झिग चढेल अशी गाणी कॉकटेलमध्ये आहेत. चित्रपटच्या कथेला साजेसे संगीत प्रीतमने दिले आहे. कथा तरुणाईची असली तरी, नावीन्य काहीच नसल्याने या ‘कॉकटेल’ची नशा चित्रपटगृहात जाऊन किती प्रेक्षक करतील याविषयी शंका आहे.

चित्रपट- कॉकटेल

निर्मता- दिनेश विजान, सैङ्ग अली खान

दिग्दर्शक- होमी अदजानिया

संगीत- प्रीतम

कलाकार- सैङ्ग अली खान, दीपिका पदुकोण, डायना पेंटी, बोमण इराणी, डिपल कपाडीया, रणदीप हुडा.

Leave a Comment