
नवी दिल्ली, दि.२४ – `लिनोव्हो’ या कंपनीने जगातील सर्वांत कमी जाडी असलेला ’ऑल-इन-वन’ संगणक (पीसी) सादर करणार असल्याची घोषणा मंगळवारी केली. या संगणकाचे नाव आयडियासेंटर ए७२० असून, तो अगदी सडपातळ म्हणजे २४.५ एमएम एवढ्या जाडीचा असणार आहे. त्याची घडी घालता येणार असल्यामुळे, आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी अगदी सहजपणे ठेवता येणार आहे.