प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती

नवी दिल्ली: भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून प्रणब मुखर्जी यांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रतिस्पर्धी पी.ए. संगमा यांचा मुखर्जी यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड होणारे प्रणबदा हे पहिलेच बंगाली नागरिक असणार आहेत.

राष्ट्रपती पदासाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि एनडीएचे पुरस्कृत उमेदवार संगमा यांच्यात सरळ लढत झाली. तृणमूल काँग्रेसने पाठींबा दिल्याने प्रणव मुखर्जी यांचा विजय निश्चित मनाला जात होता. युपीएतील घटक पक्षांसह समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ष्ट्रीय जनता दल आणि एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना, जनता दल (सेक्युलर) यांनी प्रणव मुखर्जी यांना पाठींबा दिला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेलगु देसम आणि तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्ष तटस्थ राहिले.

भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची कार्यकालाची मुदत दि. २४ जुलै रोजी संपुष्टात येत असून २५ जुलै रोजी प्रणबदा राष्ट्रपतीपद ग्रहण करतील.

Leave a Comment