
नवी दिल्ली, दि. २२ – वार्षिक वेतन पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास यावर्षापासून कर विवरणपत्र (टॅक्स रिटर्न) भरण्याची गरज नसल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली, दि. २२ – वार्षिक वेतन पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास यावर्षापासून कर विवरणपत्र (टॅक्स रिटर्न) भरण्याची गरज नसल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
`ज्यांचे वार्षिक वेतन पाच लाख रुपयांच्या आत आहे आणि बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न दहा हजार रुपयांच्या पेक्षा कमी आहे व इतर कोणतेही उत्पन्न नाही, त्यांनी यावर्षी २०१२-१३ चे कर विवरणपत्र भरण्याची गरज नाही,’ असे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, ज्यांना परतावा (रिफंड) हवा आहे, त्यांनी रिटर्न भरणे आवश्यक ठरणार आहे.
रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. देशात पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक वेतन असलेले सुमारे ८५ लाख कर्मचारी आहेत, त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. रिटर्न भरण्यापासून सवलत मिळवण्यासाठी या कर्मचार्यांनी बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न आपल्या कंपनीला सांगणे आवश्यक ठरणार आहे.
मात्र नोकरीदाता, कंपनीकडून कर कपातीचे फॉर्म-१६ मिळणार्या करदात्यांनाच ही सवलत लागू असेल. त्याचबरोबर कर सवलतीसाठी कर्मचार्यांना बँक बचत खात्यावर मिळणार्या व्याजाची माहिती आपल्या कंपनीला कळवावी लागणार आहे.