अण्णा नव्हे, तर अण्णांची टीम उपोषणावर बसणार

फरीदाबाद, दि. २२ – अण्णांचे आरोग्य व वय पाहून, २५ जुलैपासून राजधानी दिल्लीच्या जंतरमंतरवर अरविंद केजरीवाल, मनीष सिसौदिया व गोपाल राय उपोषण करतील. ही माहिती टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी नीलम बाटा रोड स्थित वैश्यभवनात म्हटली. टीम अण्णाचे सदस्यांनी नीलम बाटा रोड स्थित एक हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, इंडिया अगेंस्ट करप्शन २५ जुलैपासून फायनल वॉर अगेंस्ट करप्शनची सुरूवात करीत आहे. या दिवसापासून अनिश्‍चितकालीन उपोषण देखील सुरू होईल.

आरोग्य व वय पाहून अण्णा हजारे यांना उपोषणावर न बसण्यासाठी टीमने राजी केले. त्यांची जागी अरविंद केजरीवाल, मनीष सिसौदिया व गोपाल राय उपोषण करतील. त्यांनी म्हटले की, देशात भ्रष्टाचार प्रमुख समस्या आहे. जर भ्रष्टाचार समाप्त झाला तर बाकीच्या समस्या आपोआपच समाप्त होईल. एक्यूट शुगर प्रॉब्लम असूनही उपोषण करणे केजरीवालसाठी किती योग्य राहील या प्रश्‍नावर केजरीवाल म्हणाले की, देशासाठी त्याग करण्याची वेळ आली आहे. फरीदाबादमध्ये इंडिया अगेंस्ट करप्शनच्या बॅनर खाली कमी कार्यकर्ते जमा झाल्याच्या प्रश्‍नावर मनीष सिसौदिया म्हणाले की, दिल्ली एनसीआर कार्यकर्त्यांना दिल्लीमध्येच आवाहन केले जाते.

खचाखच भरलेले वैश्य भवनाच्या गर्दीत भाजपा, वीएचपी व आरएसएसचे समर्थक जास्त प्रमाणात उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, सरकारी लोकपालमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप लावणार्‍याला पुरावे देखील पुरवठा करावे लागेल असे न केल्यावर त्याला दोन वर्षाची शिक्षा मिळेल. पुरावे पुरवठा करणे व आरोप सिद्ध झाल्यावर आरोपीला सहा महिन्याची शिक्षा होईल. अशा पंतप्रधानांकडून काय अपेक्षा केली जावी जे स्वत:विरूद्ध निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तयार नाहीत. त्यांनी पनडुब्बी खरेदी घोटाळा, कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा इत्यादीद्वारे केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

यादरम्यान सर्वजणांनी टीम अण्णाच्या आंदोलनाला समर्थन देण्याची घोषणा केली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अजय गौड, सीमा त्रिखा, अश्‍वनी त्रिखा, आनंदकांत भाटिया, कॉमरेड भोले सिंह इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment