
पूजा भट्टच्या आगामी `जिस्म २’ या चित्रपटाला सेंसॉर बोर्डने `ए’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. या संदर्भात पूजा भट्टने सांगितले की, हा चित्रपट वयस्क चित्रपट असून, परिपक्व दर्शकांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ४० वर्षीय पूजाचे म्हणणे आहे की, हा चित्रपट फक्त मल्टीप्लेक्सच्या दर्शकांसाठी बनवण्यात आलेला नाही. पुढे ती असेही म्हणाली की, एका विशिष्ठ वर्गासाठी मी चित्रपट तयार करत नाही. पूजाचे म्हणणे आहे की, ती अशा विषयावर चित्रपट तयार करते, जो सामान्य व्यक्ती समजू शकेल. त्यानंतर तिने हे ही आवर्जून सांगितले की, लहान मुलांनी हा चित्रपट पाहू नये.
