नामशेष होणाऱ्या भाषा ‘गुगल’ करणार जतन

मेक्सिको: भाषेचे संरक्षण आणि संवर्धन हे त्या भाषिक गटाच्या संस्कृतीचे जतन ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या भाषा मरणपथाला  लागलेल्या आहेत; त्यांचे जतन करण्यासाठी ‘गुगल’ने पुढाकार घेतला आहे.

जगभरात साधारणपणे सात हजार भाषा आणि बोली बोलल्या जातात. मात्र त्यापैकी तब्बल तीन हजार भाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.  अमेरिकेतील नाव्हजो, स्पेनमधील एरोगोनिक, भारतातील कारो, टांझानियातील बुरुंगी या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही भाषा आहेत.

 मर्यादित संख्येच्या भाषिक वर्गाच्या बोलीचा व्यवहारात उपयोग नसल्याने अथवा भाषिक समूहाच्या मोठ्या स्थलांतरामुळे या भाषांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा भाषांमधील उपलब्ध साहित्य, गाणी, लोककथा गुगलच्या संकेतस्थळावर पाठवून या भाषांच्या जतनास हातभार लावावा; असे आवाहन गुगलच्या विपणन विभागाचे व्यवस्थापक मिग्युईल अल्बा यांनी केले आहे.

Leave a Comment