`मै लक्ष्मी तेरे आंगण की’ या मालिकेत लक्ष्मीचा आघाडीचा रोल करीत असलेली श्रद्धा आर्य शुटींग दरम्यान सेटवरील एका अपघातातून बचावली. या अपघातामुळे तिला फारशी दुखापत झाली नसली, तरी तिच्या डोक्याला थोडासा मार लागला आहे.

`मै लक्ष्मी तेरे आंगण की’ या मालिकेच्या चित्रिकरणाचे काम सध्या सुरु आहे. एका प्रसंगाचे रिहर्सल सुरू होती. यावेळी लक्ष्मीला काही गुंड अचानक घेरतात, असे चित्रीकरण करण्यात येत होते. गुंड तिच्यावर हल्ला करीत असताना लक्ष्मीला पाठीमागे पडायचे होते. यावेळी तिला या मालिकेचा नायक असलेला अर्जुन म्हणजेच सुदीप साहिर तिला पकडतो, असे चित्रिकरण चित्रित केले जात होते. यावेळी सुदीप त्याठिकाणी हजर नव्हता. श्रद्धाने रिहर्सल सुरू केली त्यावेळी सुदीप पाठीमागे नव्हता, याची कल्पना तिला नव्हती. श्रध्दाने पाठीमागे पडण्यासाठी झेप घेतली. त्यावेळी दिग्दर्शक जोराने ओरडले, हा आवाज ऐकून सुदिपने जोराची उडी मारून श्रद्धाचे डोके जमिनीवर आपटण्यापासून वाचवले. त्यामुळे श्रद्धाला कुठे लागले नाही. मात्र, हाताला व डोक्याला मात्र थोडेसे खरचटले आहे. या प्रकारामुळे श्रद्धा काही वेळ घाबरून गेली होती. यावेळी घडणाऱ्या अपघतापासून वाचवल्यामुळे सर्व टीमने मात्र सुदिपचे अभिनंदन केले आहे.