सप्लाय चेन मॅनेजमेंट

chain

व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात सप्लाय चेन मॅनेजमेंट हा एक स्पेशलायझेशनचा विषय झाला आहे.  कारण आता आपल्या देशातून परदेशात बराच माल निर्यात होत आहे. या वाढत्या निर्यातीमध्ये बाहेर पाठवला जाणारा माल उत्पादकापासून ते जहाजांपर्यंत वेळेवर, पर्याप्त प्रमाणात आणि सुरक्षितपणे नेऊन पोचवणे हे एक मोठे आव्हान असते. त्याशिवाय काही उत्पादकांना आपला माल रिटेल विक्रेत्यांपर्यंत नेऊन पोचवण्यासाठी काही यंत्रणा निर्माण कराव्या लागतात. या यंत्रणांतील पॅकिंग मटेरियल उपलब्ध करून देणे,  वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे अशीही कामे कोणीतरी कराव्या लागतात. या सार्‍या व्यवस्थांना सप्लाय चेन मॅनेजमेंट असे म्हटले जाते.

देशात आणि परदेशात देशांतर्गत व्यापार वाढत आहे आणि निर्यात व्यापारही वाढत आहे. या वाढत्या व्यापाराने सप्लाय चेन मॅनेजमेंटची गरज निर्माणही केली आहे आणि वाढवलीही आहे. एकदा अशी गरज वाढायला लागली की तिचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि स्पेशलायझेशन या गोष्टी आपोआपच वाढायला लागतात. देशातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांत  शिकवल्या जाणार्‍या एमबीए  अभ्यासक्रमाच्या विविध विषयांत याही विषयाचा समावेश केला गेलेला आहे. पण बंगलोरच्या संस्थेत या विषयाचा विशेष अभ्यास करण्याची सोय आहे. (संकेतस्थळ www.iimb.ernet.in  ) या  संस्थेत या विषयाच्या संशोधनाचीही सोय करण्यात आलेली आहे. या संस्थेत सप्लाय चेन मॅनेजमेंट सेंटर ही एक वेगळी शाखाच सुरू करण्यात आलेली आहे.  काही उद्योगांनी आणि संघटनांनी पुढाकार घेऊन बंगलोरमध्ये  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट (आयआयएमएम) अशी केवळ या विषयाला वाहिलेली संस्था स्थापन केलेली आहे.( www.iimm.org) या संस्थेच्या ४५  शाखा आहेत आणि १९ ठिकाणी या संस्थेचे विविध विषय शिकवले जातात. या संस्थेचे काही अभ्यासक्रम असे आहेत. त्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे एमबीए इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. हा अभ्यासक्रम मैसूरच्या कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी या मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने चालवला जातो. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा म्हणजेच चार सेमिस्टर्सचा आहे.

असाच एक अभ्यासक्रम एमबीए इन मटेरियल मॅनेजमेंट असा असून, तो पंजाबच्या पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी च्या साह्याने चालवला जात असतो. याशिवाय आयआय एमएम या संस्थेतर्फे डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट असा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही चालविला जात असतो. हा अभ्यासक्रम एमबीए नंतर दोन वर्षाचा आहे, तो बाहेरूनही पूर्ण करता येतो. अधिक माहितीसाठी [email protected]  या संकेत स्थळावर संपर्क साधावा.

Leave a Comment