रिलायन्स कॉमचा थ्रीजी टॅब्लेट अनेक सवलतींसह बाजारात

रिलायन्स कम्युनिकेशनने अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेला नवा थ्रीजी टॅब्लेट बाजारात आणला असून, त्याची किंमत १४,४९९ रू. इतकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिलायन्सने जीएसएम व सीडीएमए व्हर्जनचे अँड्रॉईड टॅब्लेट यापूर्वीच बाजारात आणला आहे. त्यानंतर हा दुसरा टॅब्लेट बाजारात सादर करण्यात आला आहे. या टॅब्लेटला सात इंची टच स्क्रीन, अँड्रॉईड २.३ ओएस, हायस्पीड प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, तीन मेगापिक्सल कॅमेरा शिवाय व्हिडीओसाठी व्हीजीए फॉण्ट कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या टॅब्लेटचे वजन आहे ४०२ ग्राम.

रिलायन्स कॉमने या टॅब्लेटसोबत ग्राहकांसाठी सवलतींचा वर्षाव केला असून, ग्राहकाला सुमारे ६,२५० रूपयांच्या अनेक सवलती देण्यात येणार आहेत. त्यात तीन जीबी डेटा तीन महिने मोफत, तीन महिने फ्री व्हीडींओ कॉलिंग, १२ महिन्यांसाठी फ्री व्हॉईस रेंटल, २५० रूपयांचे फ्री ग्लोबल कॉलिंग अशा अनेक सवलती आहेत. रिलायन्सचे ग्रुप हेड ब्राण्ड मार्केटिंग संजय बहल म्हणाले की, या नव्या थ्रीजी टॅबमध्ये जीमेल, यूट्यूब, मॅपस, गुगल सर्च, इटी हे प्रीलोड करूनच देण्यात येणार आहे. शिवाय अँड्रॉईड प्ले स्टोअरही ग्राहक ऍक्सिस करू शकणार आहेत.