तालिबानी हल्ल्यात नाटोची २२ वाहने उध्वस्त

काबूल दि.१९- गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास अफगाणिस्तानातील फौजांसाठी साधनसामुग्री घेऊन जाणारी २२ वाहने तालिबान्यांनी केलेल्या स्फोटकांच्या हल्ल्यात उद्धस्त झाली असल्याचे वृत्त आहे. तालिबानी प्रवक्ता झबेउल्ला मुजाहिद याने दिलेल्या माहितीनुसार यूएसच्या सहकारी फौजांसाठी इंधन आणि अन्य साहित्य घेऊन आलेले ट्रक आणि ट्रेलर काबूल कडून उझबेकिस्तानकडे जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला पार्क करण्यात आले होते. तालिबान्यांनी त्यातील एका ट्रकवर स्फोटके फेकून हल्ला केला. स्फोट होताच तालिबान्यांनी गोळीबारही केला. इंधन टँकरवरच ही स्फोटके टाकण्यात आल्याने आजूबाजूच्या २२ ट्रक व टँकरनीही पेट घेतला.

बुधवारीही तालिबायांनी डिटोनेटर वापरून रसद घेऊन जाणारा १ टँकरही उद्धस्त केला होता. तर पश्चिम अफगाणिस्तानातील तुलनेने शांत भागात नाटोचे एक हेलिकॉप्टरही कोसळून दोन ट्रूप जखमी झाले असेही समजते.