विंडोज-८ येणार २८ ऑक्टोबरला बाजारपेठेत

न्यूयॉर्क: संगणक, स्मार्टफोन आणि टेब्लेत नजरेसमोर ठेऊन विकसित करण्यात विंडोज-८ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम २८ ऑक्टोबरला बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

मायक्रोसोफ्टच्या विंडोज विभागाचे प्रमुख स्टीव्हन सिनोफस्काय यांनी ही तारीख बैठकीत जाहीर केल्याचे कंपनीच्या जनसंपर्क विभागाचे व्यवस्थापक ब्रांडन लीब्लेंक यांनी सांगितले. जगभरातील २३१ बाजारपेठांमध्ये एकूण १०९ भाषांमध्ये विंडोज- ८ उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात कंपनीचे प्रमुख स्टीव बालमेर म्हणाले की; गेल्या १७ वर्षात कंपनीची ही मोठी कामगिरी आहे. कंपनीने सन 2009 मध्ये विंडोज-७ बाजारपेठेत आणले असून त्याच्या ६३ कोटी संचांची विक्री झाली आहे.