अभिनेत्री जुही चावलाने आता हेमामालिनी आणि स्मृती इराणी यांच्या पावलावर पाउल टाकत राजकारणात उतरण्याचे ठरविले आहे. जुही चावला गुजरातच्या पोरबंदर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी जुहीला परफेक्ट उमेदवार म्हणून भाजपने या ठिकाणावरून निवडणुकीत रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. जुहीचा पती जय मेहता या मतदार संघातील रहिवासी असल्याने तिने या मतदारसंघातून नशीब आजमाविण्याचे ठरविले आहे.
जुही चावला उतरणार राजकारणात
जुहीने या मतदारसंघातून निवडणुक लढवावी यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी जुही व जय मेहता या दोघाची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याशिवाय जय मेहता कोलकत्ता नाईट रायडर आयपीएल टीम संघाचा पार्टनर शाहरुख खानसोबत पोरबंदरमध्ये लवकरच क्रिकेट स्टेडियम उभारणार आहे.त्याचप्रमाणे जयने तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत.