केंद्र शासन बलात्काराच्या कायद्यात सुधारणा करणार

नवी दिल्ली: बलात्काराच्या व्याख्येत बदल करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविमर्श केला जाणार असून सुधारीत व्याख्येमुळे पुरुषांवर होणार्या लैंगिक अत्याचाराबद्दलही त्याच कायद्यानुसार कारवाई कारणे शक्य होणार आहे.
     सध्याच्या बलात्काराच्या व्याख्येत बदल करून गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करावी याबाबत महिला व बालकल्याण मंत्रालयाने विधेयक मांडले होते. त्यानुसार बलात्कारासंबंधी कायद्यात बलात्कार ऐवजी लैंगिक शोषण असा शब्द वापरण्यात येईल. त्यामुळे स्त्री- पुरुष असा भेद न करता त्या कायद्याच्या आधारे कारवाई करता येणार आहे.
     भारतीय दंडविधानात ३२६-अ आणि ३२६-ब या नवीन कलामांचा समावेश करून त्यानुसार एसिड फेकण्यासारख्या गुन्ह्यात आरोपीला १० वर्षापर्यंत अधिक कडक शिक्षा कारणे शक्य होणार आहे.  

Leave a Comment