नवी दिल्ली दि.१८ – प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीमुळे रिक्त झालेल्या लोकसभतील सभागृह नेतेपदी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
लोकसभा सभागृह नेतेपदी सुशीलकुमार शिंदे?
मुखर्जी यांच्यानंतर पी . चिदंबरम हे मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ असले तरी त्यांच्यावर आधीच अनेक जबाबदार्या सोपवण्यात आल्या आहेत .तसेच शिंदे हे या पदावर योग्यपणे काम करतील , असे पक्षश्रेष्ठींचे मत असल्याचे समजते .
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.