मच्छिमार्‍यांच्या मृत्युबद्दल अमेरिकेकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली दि.१८ – दुबईनजीक अमेरिकी नौदलाच्या जहाजातून करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमार्‍याचा मृत्यु झाला. या घटनेद्दल अमेरिकेने खेद व्यक्त केला असून या प्रकरणी पूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून या घटनेची व्यापक चौकशीची मागणी केली आहे. भारतातील अमेरिकी राजदूत नॅन्सी पॉवेलने परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांना दूरध्वनी करून खेद प्रकट केला.

Leave a Comment