
वॉशिंग्टन, दि. १९ – गूगलच्या माध्यमातून आता अंटार्क्टिकवर त्या झोपड्यांची छायाचित्रदेखील पाहिली जाऊ शकणार आहेत, ज्यांत कधी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव शोधण्यासाठी गेलेले सर अर्नेस्ट शेकल्टन आणि रॉबर्ट फाल्कन स्कॉट राहिले होते.
वॉशिंग्टन, दि. १९ – गूगलच्या माध्यमातून आता अंटार्क्टिकवर त्या झोपड्यांची छायाचित्रदेखील पाहिली जाऊ शकणार आहेत, ज्यांत कधी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव शोधण्यासाठी गेलेले सर अर्नेस्ट शेकल्टन आणि रॉबर्ट फाल्कन स्कॉट राहिले होते.
गूगलने आपल्या मॅप सर्व्हिसअंतर्गत ही छायाचित्रे ऑनलाइन उपलब्ध केली आहेत. लाकडापासून बनलेल्या या झोपड्या १९०८ आणि १९११ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. त्या दक्षिण ध्रुव शोधण्यासाठी गेलेल्या लोकांचे मुख्य ठिकाण होते. या छायाचित्रांना ३६० अंशाच्या कोनावर पाहिले जाऊ शकते. त्यामुळे तेथील सर्व बारीकसारीक वस्तूंचा अंदाज येऊ शकतो.
या छायाचित्रांवरून असे दिसते की, या झोपड्या चांगल्याप्रकारे संरक्षित करण्यात आल्या आहेत. न्यूझिलँडच्या अंटार्टिक हेरीटेज ट्रस्ट या संघटनेच्या वतीने चालविल्या जात असलेल्या संरक्षण कार्याचा लाभ या दोन्ही झोपड्यांना मिळाला आहे. गूगलदेखील या कामी सहकार्य करीत आहे.
जमा असलेली लाकडे
शेकल्टन यांची झोपडी केप रोयड्समध्ये आहे. तेथे ते थंडीत आपल्या इतर ९ साथीदारांसह राहात होते. या झोपडीत शेकल्टन यांच्या पथकाच्या सुमारे पाच हजार वस्तू अजूनही आहेत. यात पुस्तके, कपडे, डबाबंद जेवण आदींचा समावेश असून कमी तापमानामुळे या वस्तुंचे संरक्षण झाले आहे.
शेकल्टन यांनी पहिल्यांदा माउंट एरबेस ज्वालामुखीवर चढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खराब हवामान आणि आवश्यक पुरवठ्याअभावी त्यांना अर्ध्यातूनच परतावे लागले होते.
दक्षिण ध्रुव त्यांच्यापासून १५६ किलोमीटर दूर राहिला होता. मात्र तरीही शेकल्टन त्या काळात दक्षिण ध्रुवाच्या सर्वात जवळ जाणारे व्यक्ती होते. ब्रिटनमध्ये परतल्यानंतर त्यांच्या संघाचे हिरोसारखे स्वागत झाले होते.
स्कॉट यांचा ठिकाणा शेकल्टन यांच्या तीन वर्षानंतर १९११ मध्ये बनविण्यात आला होता. त्यांच्या मोहिमेशी संबंधीत आठ हजारांपेक्षा जास्त वस्तू आहेत. स्कॉट यांच्या झोपडीत अजूनही खाण्याचे खूप पदार्थ आहेत. त्यांच्या टीमने ध्रुवाकडे जाताना तेथे सोडले होते.